संयुक्त राष्ट्राच्या महासभेत इम्रान खान यांनी भारतावर आरोप केले.भारताला घेराव घालण्याचा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा प्रयत्न होता. इम्रान खान यांनी नेहमीप्रमाणे पाकिस्तानचे गोडवे गात त्यांचा देशी कसा दहशतवादाची शिकार झाला आहे असे सांगितले आणि काश्मीरचा राग आवळत भारतावर चुकीचे आरोप केले. आपल्या भाषणात इम्रान यांनी म्हटले की, “काश्मीरमधील डेमोग्राफिक चेंज थांबवावा लागेल. भारत आपली लष्करी ताकद वाढवत आहे पण पाकिस्तानकडे अण्वस्त्रेही आहेत.” मात्र नेहमीप्रमाणे पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताकडून चोख प्रत्युत्तर मिळाले.
भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी राईट टू रिप्लायच्या अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. स्नेहा दुबे या संयुक्त राष्ट्र महासभेत भारताच्या सरचिटणीस आहे.संयुक्त राष्ट्राच्या महासभेत इम्रान खान यांनी भारतावर केलेल्या आरोपांवर स्नेहा यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
पाकिस्तानच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना स्नेहा दुबे म्हणाल्या की, “इम्रान खान पाकिस्तानमध्ये घडणाऱ्या कारवायांपासून जगाचे लक्ष दुसरीकडे वळण्यासाठी अशा रचलेल्या गोष्टी सांगत आहे. दहशतवादी त्यांच्या देशात मुक्तपणे फिरतात आणि सामान्य नागरिक, अल्पसंख्याक समुदायाचे लोक दररोज अत्याचाराला बळी पडतात”. ओसामा बिन लादेन सारख्या दहशतवाद्यांना पाकिस्तान कसे आश्रय देत होते, याची स्नेहाने आठवणही करून दिली. स्नेहा म्हणाल्या “पाकिस्तानला दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा इतिहास आहे, त्यांना पाकिस्तानचा सक्रियपणे पाठिंबा आहे याची अनेक देशांना जाणीव आहे. हे त्यांचे धोरण आहे. दहशतवाद्यांना पाठिंबा देणे, शस्त्रास्त्रे पुरवणे आणि आर्थिक मदत करणे यासाठी पाकिस्तान जागतिक स्तरावर ओळखला जातो.”तसेच त्या म्हणाल्या की “पाकिस्तान दहशतवादी संघटनांचे प्रशिक्षण केंद्र बनत आहे, वर्षानुवर्षे त्यांना निधी आणि मदत करत आहे आणि काश्मीरवर बेकायदेशीरपणे कब्जा कसा करत आहे”.