पाचशे चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या घरांना मालमत्ता कर सर्वच शहरांमध्ये माफ करण्याचा निर्णय

0
98

राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई आणि ठाण्यातील पाचशे चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय हल्लीच जाहीर करण्यात आला. आता हीच याेजना राज्यातील सर्वच शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवण्यात येईल अशी माहिती राज्याचे उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी साेमवारी औरंगाबादेत दिली. राज्य सरकारने मुंबई-ठाण्याबाबत निर्णय घेतल्यानंतर आता राज्यातील सर्वच शहरांमधून करमाफीचा निर्णय घेण्याबाबत मागणी जाेर धरू लागली आहे.

पत्रकारांनी देसाई यांना इतर शहरांनाही ही सुविधा देणार का असा प्रश्न विचारला असता हळूहळू इतर शहरांसाठीदेखील अशाच प्रकारचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.या निर्णयामुळे सिडको-हडकोवासीयांसह अनेक छोट्या गरीब आणि मध्यमवर्गीय वस्त्यांना दिलासा मिळू शकतो. तर आता ८०० ते १००० चौरस फुटांपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या घरांना व मालमत्तांना ही सूट मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here