पाट हायस्कूलमध्ये विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न

1
27
पाट हायस्कूल,विद्यार्थी गुणगौरव समारंभ,
पाट हायस्कूलमध्ये विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न


कुडाळ/मनोज देसाई –
एस .के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट, पंचक्रोशी पाट संचलित एस.एल .देसाई विद्यालय कै. एस. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान उच्च महाविद्यालय तसेच इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये कै. सौ सुहासिनी रामचंद्र ठाकूर स्मृतिदिन व कै. रामचंद्र नीळकंठ ठाकूर स्मृती पारितोषिक वितरण समारंभ संस्था पदाधिकारी सुधीर ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.https://sindhudurgsamachar.in/kokan-इनरव्हीलचा-पदग्रहण-सोहळ/

प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर यांनी सर्व संस्था पदाधिकारी, पालक प्रतिनिधी व विद्यार्थी प्रतिनिधी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ.दीपिका सामंत यांनी कै. सौ. सुहासिनी रामचंद्र ठाकूर व कै. रामचंद्र नीळकंठ ठाकूर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या ओघवत्या भाषणातून केला. कै. सौ. सुहासिनी रामचंद्र ठाकूर स्मृती पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे – इयत्ता पाचवी -भक्ती योगेश तेली कोचरेकर, इयत्ता सहावी -आर्यन अनिल परब ,इयत्ता सातवी- मिहीर विजय मेस्त्री ,इयत्ता आठवी- दिया निलेश सामंत ,इयत्ता नववी- प्रज्योत विजय मेस्त्री.
कै. रामचंद्र नीळकंठ ठाकूर स्मृती पारितोषिक प्राप्त विद्यार्थी –
इयत्ता दहावी -महती रवींद्र बुरुड, इयत्ता अकरावी विज्ञान- जळवी अंकिता अरुण, इयत्ता अकरावी वाणिज्य -रावले ज्ञानेश अविनाश, इयत्ता अकरावी कला- मांजरेकर मानसी पांडुरंग, इयत्ता बारावी विज्ञान- सार्थ सच्चिदानंद पाटकर, इयत्ता बारावी वाणिज्य -राखी जगन्नाथ सामंत, इयत्ता बारावी कला- दिपाली रमेश केसरकर. हे सर्व सन 2023 -24 मधील इयत्ता पाचवी ते बारावी मधील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी आहेत.
याच दिवसाचे औचित्य साधून संस्था व विद्यालयातर्फे इयत्ता दहावी, बारावी, इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्तीधारक व एन एम एम एस शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचाही गुणगौरव सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सर्व संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला …..नावे पुढील प्रमाणे- इयत्ता दहावी प्रथम क्रमांक बुरुड महती रवींद्र 98.00%, द्वितीय क्रमांक रावले जानह्वी प्रसाद 97.20 ,तृतीय क्रमांक तळवडेकर प्रज्वल प्रशांत 96.40 ……. 90% पेक्षा जास्त गुणप्राप्त विद्यार्थी अनुष्का अविनाश रावले 96.00, गौरांग बाळकृष्ण गोसावी 95.00, पाटकर दुर्वांगी चंद्रशेखर 95.00, हेमांगी केशव मेतर 94. 40 ,सामंत श्वेता श्रीकृष्ण 93.80 ,राऊळ कस्तुरी ज्ञानेश्वर 93.80, केरकर वैभवी संतोष 93.60, हंजनकर दीक्षांत योगेश 93.40 ,गोलतकर पूर्वा प्रदीप 92.20, सामंत ओम जितेंद्र 91.80, पराडकर अनुष्का किरण 91.20 ,खवणेकर सलोनी राजन 90.20 इ,यत्ता बारावी विज्ञान विभाग -पाटकर सार्थ सच्चिदानंद 82.00, द्वितीय क्रमांक आरोलकर अपूर्वा महेश 73.67 ,तृतीय क्रमांक गावडे भक्ती गुरुनाथ 73.33, तृतीय क्रमांक गावडे संपदा संभाजी 73.73, वाणिज्य विभाग- प्रथम क्रमांक सामंत राखी जगन्नाथ 86.17, द्वितीय क्रमांक पाटकर चंदन विनोद 85 .00 तृतीय क्रमांक खोत सिद्धी रामचंद्र 84.33, कला विभाग- प्रथम क्रमांक केसरकर दिपाली रमेश 70.00, द्वितीय क्रमांक नांदोस्कर शिवराम अनिल 67.83 ,तृतीय क्रमांक पाटील रसिका हनुमंत 64.83
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी….
1)दिया निलेश सामंत 252 /300 84.00 राष्ट्रीय ग्रामीण विभागात पहिली
2)गायत्री गणेश जोशी 216 /300 72 .00 राष्ट्रीय ग्रामीण विभागात दुसरी
3)शुभंकर संदेश नाईक 206/ 300 68.66 राष्ट्रीय ग्रामीण विभागात सहावा
4)सौमित्र सुधीर मळेकर 202/ 300 67.33 राष्ट्रीय ग्रामीण विभागात सातवा
5)वैभवी नारायण केळुसकर 172/300 57.33 ग्रामीण सर्वसाधारण
6)प्राजक्ता प्रदीप दाभोलकर 186/300 62.00 ग्रामीण सर्वसाधारण
7)वेदिका सतीश नार्वेकर 162/300 54.00 ग्रामीण सर्वसाधारण
8)चैतन्या राजेश कोळंबकर 174/300 58.00 ग्रामीण सर्वसाधारण
9)शिवानी मंगेश सर्वेकर 196/300 65.33 ग्रामीण सर्वसाधारण
10)स्वयम अमृत महाडीक 174/300
58.00 ग्रामीण सर्वसाधारण
11)पूर्वा चंद्रकांत ताम्हणकर 164/300 54.66 ग्रामीण सर्वसाधारण
12)वेदश्री मंगेश अवसरे 174 /300 58.00 ग्रामीण सर्वसाधारण

पाचवी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी
1)भार्गव शंकर पेडणेकर 250/ 300 83.89 ग्रामीण सर्वसाधारण विभागात जिल्ह्यात पहिला
2)भक्ती योगेश तेलीकोचरेकर 210/300 70.46 ग्रामीण सर्वसाधारण
3)सहज रवींद्र बुरुड 200/ 300 67. 11 ग्रामीण सर्वसाधारण

राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास शिष्यवृत्ती परीक्षा[ एन. एम. एम. एस.] प्राप्त विद्यार्थी 1) स्वयम अमृत महाडिक GEN-5 2)गायत्री गणेश जोशी GEN-6 3) वैभवी नारायण केळुसकर SBC-2 4) युक्ती संतोष हळदणकर OBC-8 5) बाळकृष्ण प्रसाद रावले EWS-5 6) जिज्ञासा राजीव चव्हाणSC-2 .

या पारितोषिकांच्या निमित्ताने समाजातील शिक्षक, पालक, देणगीदार ,विद्यार्थी, संस्था पदाधिकारी हे पाच घटक एकत्र आले आहेत .ठाकूर कुटुंबीयांनी सी.ए., इंजिनियर ,कंपनी सेक्रेटरी त्या काळातील पदे भूषवून राष्ट्रीय यश संपादित केले आहे .असे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधीर ठाकूर यांनी कै.सौ. सुहासिनी रामचंद्र ठाकूर यांच्या कुटुंबीयांचा गौरव करताना व्यक्त केले. संस्थाचालकांसाठीचा आत्ताचा काळ हा कसोटीचा आहे. पालक व नागरिक जागरूक झाल्या शिवाय शैक्षणिक परिस्थिती बदलणार नाही. पालकांनी जागरूक व्हावे ही अपेक्षा मी व्यक्त करतो. संस्थेच्या सचोटीमुळेच वेगवेगळ्या प्रकारे निधी संस्थेला उपलब्ध होत आहे. एकनाथजी ठाकूर आमचे आदर्श आहेत. संस्था चालवायची असेल तर विद्यार्थ्यांचा सर्वात प्रथम विचार करा या त्यांच्या मौलिक तत्त्वानुसारच आमची संस्था मार्गक्रमण करत आहे असेही ते आपल्या भाषणात म्हणाले .इतर विद्यार्थ्यांनीही या बक्षिस पात्र मुलांकडून प्रेरणा घेऊन आपणही असे बक्षीस मिळवले पाहिजे अशी इच्छा मनात निर्माण करा असा संदेश मुख्याध्यापक राजन हंजनकर यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने संस्था पदाधिकारी राजेश सामंत यांनी प्रशालेतील राज्यात पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यास 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. व्यासपीठावर राजेश सामंत, देवदत्त साळगांवकर, दीपक पाटकर, सुभाष चौधरी, नारायण तळवडेकर, सुधीर ठाकूर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर ,पर्यवेक्षक सयाजी बोंदर ,ज्येष्ठ शिक्षक संदीप साळसकर उपस्थित होते. सूत्रसंचालन यज्ञा साळगांवकर व आभार पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, पुरस्कार प्राप्त विद्यार्थी तसेच त्यांचे पालक उपस्थित होते.

1 COMMENT

  1. […] कणकवली – गेली अनेक वर्षें आम्ही मुंबईतील पश्चिम उपनगरांत राहणार्या कोकण-गोवा वासियांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेनेही कोकण-गोवापर्यत रेल्वे गाड्या सोडाव्यात, अशी सातत्याने मागणी करीत आहोत. आता तर कोकण रेल्वे वीजेवर धावत आहे. गणेशोत्सव कालावधीत या मार्गावरुन रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहेत. तरी आता पश्चिम रेल्वेनेही विनाविलंब या मार्गावरून नियमितपणे गाड्या सोडाव्यात, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. https://sindhudurgsamachar.in/पाट-हायस्कूलमध्ये-विद्या/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here