ओरोस येथे ना. उदय सामंत यांच्या हस्ते झाले लोकार्पण
प्रतिनिधी – पांडूशेठ साटम.
पालकमंत्री ना. उदय सामंत, खासदार विनायक राउत, आमदार वैभव नाईक आ.दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून राज्यशासनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ६ नवीन रुग्णवाहिका आणि खनिकर्म विभागाच्या माध्यमातून आणखी ३ नवीन रुग्णवाहिका असे एकूण ९ रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत. आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे या रुग्णवाहिकांचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर रुग्णांची ने-आण करण्यासाठी अँब्युलन्सची कमतरता भासता नये यासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत, खा. विनायक राउत, आ. वैभव नाईक, आ.दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे प्रयत्न सुरु आहेत. याआधीही राज्यशासनाकडे पाठपुरावा करून जिल्ह्यासाठी रुग्णवाहिका उपल्बध करण्यात आल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट आली असून तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज आणखी ९ नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या असून आज याचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे रुग्णांना याचा लाभ होणार आहे.
यावेळी आमदार वैभव नाईक,शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. महेश खलिपे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.श्रीपाद पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, नितीन वाळके,संजय भोगटे,सुभाष मयेकर आदी उपस्थित होते.