पारोळा – आज फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या शनिवारी पारोळा तालुक्यातील पिंपळकोठे गावात उपस्थित राहून आपले श्री उमेश पाटील साहेब महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष ग्रंथालय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी आदरणीय ना.श्री.जयंतरावजी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतुन ‘एक तास राष्ट्रवादीसाठी- आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी- प्रभावी/प्रगल्भ/तरुण/पुरोगामी विचारांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच पिंपळकोठे गावातील तरुणांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे स्पर्धापरीक्षा संच वाटप ही केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देशाचे नेते आदरणीय खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे नेतृत्व लाभलेले आहे. आपल्या पक्षाच्या मागे विचारांची एक मोठी ताकद आहे. या विचारांचा प्रसार करण्यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करायची आहे.


