येत्या 24 तासांमध्ये कोकणामध्ये मान्सून दाखल हो असल्याचा अंदाज हवामान खात्याने त्यानंतर तो हळूहळू महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये सक्रीय होईल, अशी माहिती हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील प्रत्येक जण मान्सूची आतुरतेने वाट पाहत आहे. बळीराजा सुद्धा शेतीच्या पुढच्या तयारीला लागण्यासाठी पावसाची वाट पाहत आहे.
गुरुवारी मान्सूनपूर्व पावसाने राज्यातील अनेक भागांमध्ये दमदार हजेरी लावली. मुंबईसह उपनगरांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्तेवाहतूक खोळंबली. तर रेल्वे सेवेवकर देखील परिणाम झाले. मान्सून पूर्व पावसामुळे थडावा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठ्याप्रमाणात दिसाला मिळाला. सातारा जिल्ह्यातील काही भागात रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकरी आनंदी झाला आहे