पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या ३८ वर्षीय युवकांकडून पुणे विमानतळावर हिरे पकडण्यात आले.सदर युवक यूएईमधून आला होता.सहा महिन्यांपूर्वी तो यूएईला गेला होता.त्याहून परत येताना पुणे कस्टम विभागाने त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्याच्याकडे ७५ कॅरेट वजनाचे तीन हजार हिरे सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या प्रकरणी अधिक तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.