पुण्याच्या बिबवेवाडीत कबड्डी खेळताना अल्पवयीन विद्यार्थिनीच्या हत्येची घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी

0
109
10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या, कोल्हापूर हादरलं
10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या, कोल्हापूर हादरलं

पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपविण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली.

शहरातील बिबवेवाडी परिसरातील इयत्ता आठवीमध्ये शिकणारी आणि कबडीपट्टू असलेल्या मुलीची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. हृषिकेश भागवत असे आरोपीचे नाव आहे.

 या घटनेबद्दल पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी सायंकाळच्या सुमारास कबड्डीच्या सरावासाठी आली होती. तेव्हा  हृषिकेश हा त्याच्या मित्रा सोबत दुचाकीवरून तिथे आला आणि काही समजण्याच्या आत त्याने कोयत्याने आणि चाकूने तिच्यावर  वार  केले. त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित  असलेल्या त्या मुलीच्या मैत्रिणींना धमकावून पळून लावले आणि तो देखील घटनास्थळावरून पसार झाला. यानंतर जखमी अवस्थेतील त्या मुलीला  रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र  तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केले असावे, असा अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच या घटनास्थळी आम्हाला पिस्तूल देखील आढळून आल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.

कबड्डीपटू होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

पुण्याचे पालकमंत्री तथा राज्य कबड्डी संघटना तसेच महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, दिवंगत मुलीला श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणाऱ्या व्यक्ती माणूस असूच शकत नाहीत. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here