पुण्यातील ‘कमिन्स कंपनी’त ५० कर्मचारी करोना अ‍ॅक्टिव्ह!

0
110

पुण्यातील कोरोना संसर्ग,त्यामुळे होणारे मृत्यू यांचे प्रमाण संपूर्ण देशात पहिल्या स्थानी आहे. कोरोना संसर्गामुळे पुण्याच्या रुग्णालयाची स्थितीही भयानकच आहे.त्यातच पुण्यातील कोथरूड भागातील कमिन्स कंपनीमध्ये ५० कर्मचारी अ‍ॅक्टिव्ह करोना रूग्ण असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासना मार्फत कंपनीला तीन दिवस बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्र व पुणे शहरामध्ये मोठ्याप्रमाणात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. त्या अनुषंगाने सदर प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन, पुणे मनपा आयुक्त यांच्यामार्फत वेळोवेळी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार उत्पादन क्षेत्रात काम करण्याची कार्यपद्धती महाराष्ट्र शासन यांनी विहीत केलेली आहे. तसेच, पुणे मनपा आयुक्तांनी देखील वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत.

पुणे मनपा आयुक्तांनी कमिन्स कंपनीला त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये कामगारांमध्ये करोनाची लागण झाल्याचे आढळून आले असून त्या अनुषंगाने सदर कंपनीची पाहणी करून अहवाल मागवण्यात आला होता. त्यानुसार सादर केलेल्या अहवाालात मागील दोन महिन्यात २४० कर्मचारी करोनाबाधित झाल्याचे व तसेच, तीन कामगारांचा कोविडमुळे म़ृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. हे प्रमाण एकूण कामगारांच्या २० टक्के आहे. तसेच, ५० कामगार अ‍ॅक्टिव्ह करोना रूग्ण असल्याचे अहवालावरून दिसून आले आहे. याशिवाय कंपनीत जेवणासाठी सर्व कामगार एकाच ठिकाणी एकत्र येत आहेत. परिणामी त्या ठिकाणी करोना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे.” तसेच सदर निर्देशांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक असतानाही कंपनीत या निर्देशांचे योग्यरितीने व परिपरूर्णपणे पालन होत नसल्याचे आढळून आले आहे

त्यामुळे पुणे मनपा आयुक्तांनि ‘ कंपनीतील कर्मचारी मोठ्या प्रमाणात करोनाबाधित होत आहेत. त्यामुळे तुमच्या कंपनीला करोनाचे हॉटस्पॉट क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येत आहे. तसेच महापालिकाआयुक्तांनी खालील निर्देश जारी करण्यात आले आहेत.

१. कंपनीचे कामकाज २० मे ते २३ मे पर्यंत बंद ठेवण्यात यावेत.
२. सर्व कामगारांचे रॅपीड अॅन्टीजन/ आरटीपीसीआर कोविड चाचणी क्षेत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली करायची असून, त्याबाबतचा अहवाल २२ मे पर्यंत त्यांच्या मार्फत सादर करावा.
३. सर्व कामगारांची पुढील आदेशापर्यंत १० दिवसांमध्ये कोविडबाबत फेर चाचणी करण्यात यावी.
४. सर्व कामगारांना फेसशील्ड मास्क उपलब्ध करून देण्यात यावे.
५. कंपनीतील कॅन्टीनमध्ये कामगारांना बसुन खाण्यासाठी प्रतिबंध करण्यात येत आहे.
६. कामगारांचे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.
७. कंपनीतील परिसर व यंत्र सामग्रीचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करून गांभीर्यपूर्वक पालन करण्यात यावे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपणविरोधात उपरोक्त संदर्भान्वये व प्रचलित अधिनियमान्वये कारवाई करण्यात येईल,याची गांभीर्याने नोंद घ्यावे. असे पत्रात सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here