केंद्र सरकारने पॅन कार्डशी आधार जोडण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 केली आहे अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करत पॅन आधार कार्ड सोबत जोडणी केली नाही तर मोठे नुकसान होऊ शकते. यामाध्यमातून तुमचे पॅन निष्क्रिय घोषित केले जाईल. निष्क्रिय पॅन वापरल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड होऊ शकतो. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी तुम्हाला 31 मार्च 2022 पर्यंत आधार-पॅन लिंक करणे गरजेचे आहे.
31 मार्चपर्यंत पॅनकार्डला आधारशी लिंक करणे अनिवार्य केले असून तसे न केल्यास तुमचे पॅन निष्क्रिय होणार आहे. नियमानुसार, जर तुमचे पॅन निष्क्रिय झाले असेल आणि तुम्ही ते बँक व्यवहारांसाठी किंवा इतरत्र वापरत असाल, तर तुम्ही ते पॅन कायद्यानुसार दिले नाही असे मानले जाईल. अशा परिस्थितीत तुमच्यावर इनकम टॅक्स कलम 272B अंतर्गत 10 हजारांपर्यत दंड आकारले जाऊ शकते. विशेष म्हणजे आता तुम्ही जर बँक खात्यातून 50 हजारांपेक्षा जास्त पैसे काढत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड दाखवावे लागणार आहे.