पेटीएमचा IPO बाजारात 8 नोव्हेंबर रोजी उघडेल

0
44

भारताच्या इतिहासातील पेटीएमचा IPO हा सर्वात मोठा IPO असणार आहे. व्यापारी पेमेंट कंपनी पेटीएमच्या आयपीओ 8 नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आणि 10 नोव्हेंबरला बंद होणार आहे.यानंतर शेअर्स 18 नोव्हेंबर रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होऊ शकतो. 

पेटीएमने आयपीओ साइज 16,600 कोटींवरून 18,300 कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे. पेटीएमची ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे 10 हजार कोटी रुपये, तर नवीन शेअर्स (IPO) द्वारे 8,300 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार आयपीओमधील त्यांची हिस्सेदारी विकतील. चीनचा अलीबाबा समूह आपल्या हिस्सेदारीमधून 784 कोटी रुपयांचे शेअर्स काढून घेणार आहे.कंपनीचे सर्वोच्च अधिकारी विजय शेखर शर्मा 402 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here