पेटीएम ही एक डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा देणारी कंपनी आहे. देशभरातील जनता आर्थिक व्यवहारासाठी पेटीएमचा मोठ्याप्रमाणात पेटीएमचा वापर करते. पेटीएम कंपनी आपल्या युजर्सला नेहमी वेगवेगळ्या ऑफर देत असते. कंपनीने आपल्या युजर्ससाठी खूपच चांगली ऑफर आणली आहे. पेटीएम कंपनी आपल्या युजर्सला मोबाईल रिचार्ज , डीटीएच रिचार्ज, पेटीएम अॅपद्वारे बिल पेमेंट करण्यावर 20 टक्क्यापर्यंत सूट देत आहे. ही विशेष ऑफर पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्हिसा डेबिट कार्ड धारकांसाठी आहे.
जर तुम्ही पेटीएम अॅपद्वारे रिचार्ज करत असाल तर तुमच्यासाठी ही ऑफर खूपच फायदेशीर आहे. जर तुम्ही पेटीएमवरुन 48 किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचे मोबाईल रिचार्ज करत असाल तर तुम्हाला 10 रुपयांची सूट मिळेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना कोणत्याही प्रोमोकोड टाकण्याची गरज नाही. यासाठी ग्राहकांना पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्हिसा कार्डद्वारे पैसे द्यावे लागतील. मोबाईल रिचार्ज व्यतिरिक्त कंपनीने आपल्या युजर्सला डीटीएच रिचार्ज, वीज बिल आणि गॅस बुकिंगवरही अशाच प्रकारची ऑफर सुरु केली आहे.
मोबाईल रिचार्ज ऑफर – 48 किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांच्या मोबाईल रिचार्जवर 10 रुपयांची त्वरित सूट देण्यात आली आहे.
डीटीएच रिचार्ज ऑफर- किमान 100 रुपयांच्या डीटीएच रिचार्जवर 10 % त्वरित सूट (कमाल सवलत- रु. 50)
वीजबिल ऑफर- किमान 500 रुपयांच्या वीजबिलावर 10% झटपट सूट (कमाल सवलत- 100 रुपये)
गॅस बुकिंग ऑफर – किमान 500 रुपयांच्या गॅस बुकिंगवर 50 रुपये त्वरित सूट