पोलिस असल्याचे सांगून व्यावसाईकाचे २ कोटी लुटले; ठाण्यातील एक पोलीस निरीक्षक या गुन्ह्यात सहभागी

1
53
फरसाण कारखान्यातील एक लाख रु. घेऊन कामगार पसार
फरसाण कारखान्यातील एक लाख रु. घेऊन कामगार पसार

नवीमुंबई- मुंबई पोलीस असल्याचे सांगत व्यावसायिकाला दमदाटी केली. तसेच त्यांच्याकडे पैशांचा मोठा साठा असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्याचे सांगून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना त्यात अटक करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने त्यांना तसेच कुटुंबियांना अटक न करण्याबाबत सांगितले असता लुटारूंनी मांडवलीकरीता त्यांच्याकडे 15 कोटी रुपयांची मागणी केली.https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-तैवान-हादरले-रा/

यावेळी व्यावसायिकाने वाशी सेक्टर 29 मध्ेय राहणार्‍या नातेवाईकांकडे 1 कोट 40 लाख रुपये असल्याचे व ही रक्कम देण्याची तयारी दर्शविल्यानंतर लुटारूंनी त्यांच्याकडे 2 कोटी रुपयांची मागणी करून त्यांना सेक्टर 29 मधील त्रिश्ला सोसायटीत नेले. त्यानंतर व्यावसायिकाने आपल्या नातेवाईकांकडून 2 कोटी रुपये घेऊन ती रक्कम लुटारूंना दिली. त्यानंतर हे लुटारू दोन्ही कारमधून पळून गेले.

या घटनेनंतर घाबरलेल्या व्यावसायिकाने सायंकाळी आपल्या वाशीतील नातेवाईकांकडे येऊन त्यांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर या व्यावसायिकाने वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वाशी पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तत्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी लुटारूंच्या वाहनांची नंबर प्लेट व सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या वर्णनावरून ठाणे ग्रामीण पोलीस दलातील सुरक्षा विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर पाच जणांना सोमवारी पहाटे वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक केली. पोलिसंकडून आता या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

या प्रकरणातील तक्रारदार व्यावसायिकाने आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम साठवून ठेवल्याची टीप व्यावसायिकाकडे पूर्वी कामाला असलेल्या वाहन चालकाने या गुन्ह्यातील आरोपींना दिली होती. त्यानंतर या आरोपींनी त्यांच्या ओळखीतील पोलीस निरीक्षक नितीन भिकाजी विजयकर यांच्यासह व्यावसायिकाला लुटण्याची योजना आखून त्यांच्याकडून 2 कोटी रुपये उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

1 COMMENT

  1. […] रत्नागिरी– सिंधुदुर्गावर शिवसेनेचा दावा आहे. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील. आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे. किरण सामंत यांनी ट्विट मागे घेतलं आहे. आमच्याकडून शिवसेनेकडून एकच उमेदवार आहे. काल रात्रीचा निर्णय भावनिक होता. शिंदे यांना त्रास होऊ नये म्हणून सर्व पदाधिकार्‍यांशी चर्चा करून माघार घेतली. उद्या रत्नागिरीला बैठक घेऊ. रत्नागिरीची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे. कार्यकर्त्यांची भावना आहे ही जागा शिवसेनेकडे असावी. https://sindhudurgsamachar.in/पोलिस-असल्याचे-सांगून-व्/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here