प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा-पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

0
83

मुंबई, दि. 2 : मुंबईला स्वच्छ आणि ग्रीन पर्यावरणाची आवश्यकता आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होत असल्याने जनजागृतीच्या उद्देशाने ऑटोकार इंडियाच्या वतीने आज मुंबईत इलेक्ट्रिक कार रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखवला तसेच श्री. ठाकरे यांनी स्वतः इलेक्ट्रिक कार चालवून या रॅलीत सहभागही घेतला.

यावेळी बोलताना मंत्री श्री.ठाकरे म्हणाले, मागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात मोठा विकास होतोय. या वाहनांचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा यासाठी ईव्ही धोरणाच्या माध्यमातून शासन विविध उपाययोजना करीत आहे. प्रदूषण कमी करण्यावरही भर देण्यात येत आहे. सर्वच शहरांमधून या वाहनांसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून चार्जिंग स्थानके वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

महालक्ष्मी रेसकोर्स पासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमार्गे विक्रोळी या मार्गावर या रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये टाटा, टेस्ला, वोल्वो, ऑडी, जग्वार, मर्सिडीज, एमजी, ह्युंडाई अशा विविध कंपन्यांची सुमारे 30 वाहने सहभागी झाली होती. अदानी इलेक्ट्रिसिटी या रॅलीचे प्रायोजक होते.यावेळी ऑटोकारचे प्रमुख श्री.सोराबजी, अदानी इलेक्ट्रिसिटीचे जी.अदानी तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here