प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील सर्व लाभार्थींना मिळणार घरे

0
113
प्रधानमंत्री आवास योजना

राज्यात अमृत महाआवास अभियानाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील सर्व लाभार्थींना घरे मिळणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. या अभियानात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून गतिमानतेने व गुणवत्तापूर्ण, दर्जेदार घरांची निर्मिती होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य शासनाच्या योजनांतून 13.14 लाख घरकुले पूर्ण करण्यात आली असून 5.61 लाख घरे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurgरेडी-समुद्रात-बुडणाऱ्य/

राज्य शासनाच्या आवास योजना जसे रमाई, शबरी, आदिम, पारधी, यशवंत, अटल यामधूनही घरकुलाचा लाभ देण्यात येतो. यामधील 5.15 लाख घरकुले मंजूर करण्यात आली असून 3.66 लाख घरकुले पूर्ण झाली आहेत.प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये राज्याला आतापर्यंत 14.26 लाख उद्दिष्ट प्राप्त झाले असून त्यापैकी 13.60 लाख (95%) मंजुरी दिली आहे. भूमिहीन लाभार्थींना जागा उपलब्ध करून देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. जागेची समस्या सोडविण्यासाठी बहुमजली इमारती, गृहसंकुले, अपार्टमेंट अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांनाही प्रोत्साहन देण्यात येत आहे, असेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here