प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथून ऑनलाइन पद्धतीने वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास कृषी महाविद्यालय पुणे येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्यपाल आचार्य देवव्रत उपस्थित होते.

विषमुक्त शेती करणे हेच देशाचे मिशन असून नैसर्गिक व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन राज्यपालांनी कृषी विभाग आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील ९०,४१,२४१ पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात १ हजार ८०८ कोटी २५ लाखांची रक्कम जमा होणार आहे. यापूर्वी राज्य शासनानेही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून भरीव रक्कम वितरित करण्याचे काम केले आहे. या हप्त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना लागवड, बियाणे, उपजीविका आणि इतर कृषी खर्चासाठी आवश्यक तातडीचे आर्थिक बळ मिळणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.