प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अच्युत ठाकूर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या वीस दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांनतर त्यांना पुण्यातील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले वीस दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच काल त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.
अच्युत ठाकूर यांचे ‘जांभूळ आख्यान’ हे संगीतबद्ध केलेले नाटक रंगभूमीवर गाजले होते. त्यांनी चाळीस वर्षांपेक्षा जास्त काल मराठी चित्रपटसृष्टीत संगीत क्षेत्रात काम केले आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट ‘श्री रामायण’ हा होता. त्यानंतर त्यांनी ‘सौभाग्य वैंकण’, ‘पैज लग्नाची’, ‘घे भरारी’, ‘सत्ताधीश’, ‘गृहलक्ष्मी’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘आता लग्नाला चला’, ‘सर्जा राजा’सह अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते.
अगदी दोन दिवसात मराठी चित्रपटसृष्टीने दोन अनमोल हिरे गमावले आहेत.त्याशिवाय अनेक मराठी कलाकारांना कोरोनाने हिरावून नेले आहे.