प्रसिद्ध गायक केके काळाच्या पडद्याआड

0
25

प्रसिद्ध गायक केके कोलकात्यात एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असताना निधन झाल आहे. लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असताना केकेची प्रकृती अचानक खालावली. परंतु या कार्यक्रमातच त्याला हृदयविकारा झटका आला आणि त्याचे निधन झाल आहे.उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु रुग्णालयातून त्यांच्या मृत्यूची बातमी आली आहे.

 केके 53 वर्षांचा होता. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासून केकेने पार्श्वगायनात आपले करियर सुरू केले होते. बॉलीवूड व्यतिरिक्त तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये त्याने गाणी रेकॉर्ड केली.सलमान खानवर चित्रित केलेल्या हम दिल दे चुके सनम मधील तडप-तडप या गाण्यासाठी त्याला खूप प्रशंसा मिळाली. रणबीर कपूरच्या ‘बचना ए हसीनो’ या चित्रपटातील खुदा जाने या गाण्यासाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here