प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला पंचत्वात विलीन 

0
20
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला

प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाला शेवटचा निरोप देण्यासाठी शेकडो चाहत्यांनी गर्दी केली होती.मानसा जिल्ह्यातील मूसागाव येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुसेवालाचे आई- वडीलांनी आपल्या मुलाला शेवटचा निरोप देण्यासाठी आलेल्या शेकडो चाहत्यांचे हात जोडून आभार मानले. वडिलांनी पगडी उतरवून चाहत्यांचे आभार मानले.

त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या मूळ गावी मानसा येथील मुसा येथे ठेवण्यात आले होते. अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती.मुसेवालाचा अखेरचा प्रवास त्यांच्या आवडत्या 5911 ट्रॅक्टरने काढण्यात आला.

मुसेवालाची रविवारी सायंकाळी जवाहरके येथे हत्या करण्यात आली.त्याच्या डोके, पाय, छाती आणि पोटात डॉक्टरांना 24 गोळ्या सापडल्या आहेत. मुसेवालाच्या डाव्या फुप्फुसात आणि यकृताला गोळ्या लागल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here