🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार -वेंगुर्ले:–
वेंगुर्ला तालुक्यांतील मातोंड – पेंडूर येथील स्वयंभू प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री देव घोडेमुखाचा वार्षिक जत्रोत्सव ६ डिसेंबर रोजी होणार आहे.यानिमित्त सकाळपासून केळी ठेवणे,नवस फेडणे,नवस बोलणे आदी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.दक्षिण कोकणातील प्रसिद्ध देवस्थान व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या शिवमांर्तडेश्वराचे हे वस्तीस्थान आहे.प्रसिध्द मातोंड श्री देव घोडेमुखाचा वार्षिक जत्रोत्सव ६ डिसेंबर रोजी होणार साजराआहेत.दक्षिण कोकणातील प्रसिद्ध देवस्थान व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या शिवमांर्तडेश्वराचे हे वस्तीस्थान आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महावितरणचे-कार्यकारी-स/
३६० चाळ्यांचा अधिपती भूत पिशाच्चगण यांचा नायक म्हणून त्याचा येथे वास असतो अशी ग्रामस्थांची दृढ श्रद्धा आहे.विशेष म्हणजे नवसाला पावणारा म्हणून या देवस्थानाची सर्वदूर ख्याती आहे. या ठिकाणीं वार्षिक जत्रोत्सला कोंबा देऊन नवस फेडतात. हे या या उत्सवाचे महत्व आहे. तसेच शरीराच्या कुठल्याही अवयवांच दुखंण असेल तर येथे नवस बोलला जातो. हा नवस फेडताना त्या अवयवाच्या मातीची प्रतिकृती देवाला वाहिली जाते. देशभरातून भाविक या देवाच्या चरणी नवस बोलण्यासाठी येतात. याची प्रचिती भक्तांना येतेच.
देव दिपावली दिवशी मातोंड येथील ग्रामदैवत श्री देवी सातेरी मंदिरात मांज्री बसते. त्यानंतर सलग तीन दिवस श्री देवी सातेरी मंदिरात जागर होतात. चौथ्या दिवशी घोडेमुख जत्रोत्सवा दिवशी गावकर मंडळी व इतर मानकरी सातेरी मंदिरात जमून मेळेकरी भूतनाथ व पावणाई या तरंगकाठ्यांसह घोडेमुख मंदिराकडे मार्गस्थ होतात. घोडेमुखाला केळी,नारळाचा नवस केला जातो. या जत्रोत्सवात सिंधुदुर्ग, गोवा,मुंबई,बेळगाव आदी भागातून या जत्रोत्सवासाठी येतात. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांनी बंदोबस्ताबाबत नियोजन करणे आवश्यक आहे.सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गावकर मंडळी व ग्रामस्थांने केले आहे.