फेसबुकचं नवं नाव ‘मेटा’ आणि नवा लोगो

0
78

 जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी आणि सोशल मीडिया कंपनीने आपले नाव आणि लोगो आजपासून बदलला आहे. या कंपनीचे सर्वोसर्वा मार्क झुकेरबर्ग यांनी आज जाहीररीत्या मेटा या नावाची घोषणा केली.गेल्या काही दिवसांपासून फेसबुक रिब्रॅण्डींग करणार अशा बातम्या येत होत्या.

कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये बोलताना झुकरबर्गने सांगितले की, ‘आता कंपनी जे कामं करत आहे ती सर्व फेसबुक या नावाखाली योग्य वाटत नव्हता.त्यामुळे आम्ही मूळ कंपनीचं म्हणजेच पॅरेंट कंपनीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. झकरबर्गने आता आपण मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलत असल्याचे सांगितलं आहे. तसंच, फेसबुकचं नवं नाव मेटा असेल. आपल्यावर एक डिजिटल जग बनले आहे. ज्यामध्ये व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट आणि एआयचा समावेश आहे. तसंच, मेटावर्स हे मोबाईल इंटनेटची जागा घेईल असा आम्हाला विश्वास आहे असेही त्यांनी सांगितले.

फेसबुकने मेटावर्स प्रोजेक्टमध्ये 2021मध्ये 10 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली होती. दरम्यान, फेसबुकने केलेला बदल हा पूर्णपणे व्यवसायिक असून वापरकर्त्यांवर म्हणजेच त्यांची सेवा वापरणाऱ्यांवर सध्या तरी काही परिणाम होणार नाही. या पुढे आम्ही सर्व कारभार हा फेसबुक फर्स्ट धोरणाऐवजी मेटाव्हर्स फर्स्ट या भूमिकेमधून करणार आहोत.’, मार्क झुकरबर्गने फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे.सध्या फेसबुक या ब्रॅण्डखाली या कंपनीच्या उप कंपन्या आहेत. यामध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, ऑक्युलस आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here