नवी दिल्ली– बंगालच्या उपसागरात अंदमानच्या दक्षिणेला हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे आज चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे चक्रीवादळ तामिळनाडूची किनारपट्टी आणि पदुच्चेरीच्या उत्तरेकडे सरकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तामिळनाडू, पदुच्चेरी, कराईकल या भागात 7 ते 10 डिसेंबर दरम्यान जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामानविभागाकडून देण्यात आली आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-news-अंगणवाड्याचे-प्राथमिक/


