बंटी और बबली चित्रपटाचा सिक्वेल 19 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.यशराज फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण व्ही शर्मा यांनी केले आहे. राणी मुखर्जी ,सैफ अली कहाणी,शर्वरी वाघ,आणि सिद्धांत चतुर्वेदी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत ‘बंटी और बबली 2’ या चित्रपटाचे ट्रेलर आज रिलीज झाले आहे.
या चित्रपटात बंटी आणि बबली सामान्य जीवन जगत आहेत बंटी हा रेल्वे तिकीट कलेक्टर आहे तर बबली एक फॅशन डिझायनर आहे. एके दिवशी पोलिस अचानक दोघांनी पुन्हा लोकांना लुटण्यास सुरुवात केली असल्याचे कारण देत दोघांनाही अटक करतात आणि इथूनच कथेला सुरुवात होते. आपली नावे वापरून चोरी करणा-यांना शोधून काढण्यासाठी बंटी आणि बबली यांचा प्रयत्न सुरु होतो.


