बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यातील आकुर्डी येथील बजाज कंपनीत दिवसभर राहुल बजाज यांच्या पार्थिव श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राहुल बजाज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. लष्कराच्या जवानांनी त्यांचे शरीर तिरंग्याने झाकून त्यांना राज्य सन्मान दिला. पुण्यातील नानापेठ परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.


