रत्नागिरी प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर.
रत्नागिरी जिल्ह्धिकारी श्री.पाटील यांनी Collectorate Ratnagiri या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले असल्याची माहिती नागरिकांना दिली आहे. या फेसबुक अकाऊंटची लिंकही त्यांनी दिली आहे. तसेच या फेसबुक अकाउंट वरून Friend request आल्यास ती न स्वीकारता BLOCK करण्यात यावी असे आवाहन त्यानी नागरिकांना केले आहे.
Collectorate Ratnagiri या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले आहे, त्याची लिंक खाली दिलेली आहे, तरी माझी सर्वांना विनंती आहे की, सदर फेसबुक अकाउंट वरून Friend request आल्यास ती न स्वीकारता BLOCK करण्यात यावी.
डॉ. बी एन पाटील ( भाप्रसे )
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी
रत्नागिरी