बिग बॉस मराठीच्या या पर्वा प्रेक्षकांचे भभरून प्रेम मिळत आहे. या पर्वा मध्ये दोन सदस्यांची नावं गाजत आहेत. ती म्हणजे तृप्ती देसाई आणि शिवलीला बाळासाहेब पाटील.
शिवलीला यांनी ‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर “इथला प्रत्येक माणूस माझा असेल”. या त्यांच्या वाक्याने सदस्यांबरोबरचं प्रेक्षकांची मने देखील जिंकली. शिवलीला यांची प्रकृती अचानक ढासळली त्या घराबाहेर पडल्या आहेत. त्यांना वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ त्यांना बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावं लागलं आहे. त्यामुळे आजपासून व्होटिंग लाईन्स बंद राहतील.


