बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिला देखील कोरोनाची लागण

0
73

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिला देखील कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट लिहित आपल्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना  दिली आहे.काजोलने लिहिले की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह झाली आहे आणि माझे लाल नाक कोणीही पाहू नये, अशी माझी इच्छा आहे. म्हणून आपण जगातील सर्वात गोड हास्य कायम ठेवू. मिस यु न्यासा.’ असे म्हणत काजोलने आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

काजोलने आपली कोरोना टेस्ट केली असता, त्यात तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आपल्याला कोरोना झाल्याची माहिती स्वतः काजोल हिने दिली आहे.तिने स्वतःचा फोटो शेअर करण्याऐवजी काजोलने तिची मुलगी न्यासा देवगणचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here