आयुष्मानने आज त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात तो ‘अॅक्शन हिरोच्या नव्या अवतारात झळकणार आहे. ‘अॅक्शन हिरो’ चित्रपटाच्या घोषणेबरोबरच त्याने चित्रपटाचा टीझर देखील रिलीज करण्यात आला आहे. हा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
रोमॅण्टिक आणि विनोदी भूमिकांमधून आयुष्मान खुरानाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.आयुष्मानने ‘अॅक्शन हिरो’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो आनंद एल रायसोबत पुन्हा एकदा काम करणार आहे. ही पोस्ट शेअर करत आयुष्मानने लिहिले की, “समस्या फक्त एकच आहे, मला लढण्याचा अभिनय येतो. लढाई येत नाही. मी या जॉनरसाठी खूप एक्साइटेड आहे. आनंद एल राय आणि भूषण कुमार यांच्यासोबत एक कोलेब करत आहे”