मुंबई: बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावच्या पॅन कार्डचा गैरवापर झाल्याचे समोर आले आहे .डिजीटल सुविधांमुळे आजकाल सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. राजकुमारने या संबंधीत फसवणुकीचा दावा दाखल केला आहे. राजकुमार रावच्या पॅन कार्डचा कोणीतरी गैरवापर करून त्याच्या नावावर कर्ज घेतले आहे. हा प्रकार राजकुमार रावला खूप उशीरा कळलाअसून त्याने तक्रार दाखल केली आहे असे सांगितले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या नावावर असलेल्या पॅनकार्डवरूनही असेच कर्ज घेण्यात आले होते.माझ्या पॅन कार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर करून माझ्या नावावर 2500 रुपयांचे छोटे कर्ज घेण्यात आले आहे. यामुळे माझ्या CIBIL स्कोअरवरही वाईट परिणाम झाला आहे. CIBIL अधिकार्याला विनंती आहे की त्यांनी या प्रकरणी कारवाई करावी आणि त्याविरुद्ध खबरदारीचे उपाय करावेत असा मजकूर लिहीत आपली फसवणूक झाल्याचे अभिनेत्याने जाहीर केले आहे.


