बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील कार्यालयात आयकर विभागाकडून पाहणी

0
109

सोनू सूदशी संबंधित मुंबईतील कार्यालयात  सहा ठिकाणी आयकर विभागाकडून पाहणी केली जात असल्याचे वृत्त समोर आले आहे. सोनू सूदची नुकतीच दिल्ली सरकारच्या शाळकरी विद्यार्थीसाठीच्या अभियानासाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर काही दिवसांतच इन्कम टॅक्स विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 

सोनू सूदने कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये सर्वात प्रथम पुढे येऊन सामान्य नागरिकांना मदतीचा हात दिला होता. सोशल मीडियाचा या काळामध्ये योग्य वापर कसा आणि कशासाठी करता येतो आणि समाजाला उपयोगी पडत येत हे दाखवत त्याने पहिल्या लॉकडाऊनमध्ये अनेक कामगारांना त्यांच्या गावी पोहोचण्यासाठी बसची व्यवस्था केली होती. अनेक गरजूंना अन्न पोहचविले होते. याशिवाय कोरोना लढात सोनू सूदने सामान्यपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचंही काम केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here