बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला 5 डिसेंबर रोजी परदेशी जात असताना मुंबई विमानतळावर थांबवण्यात आले. ईडीने तिच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे.तिहार तुरुंगात कैदेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्याशी असलेल्या संबंधांबद्दल तिच्याकडे चौकशी करण्यात आली.
ईडीने 24 ऑगस्ट रोजी सुकेशचा चेन्नईतील सी-फेसिंग बंगला जप्त केला होता. बंगल्यातून 82.5 लाख रुपये, 2 किलो सोने आणि 12 पेक्षा जास्त आलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत. अभिनेत्री आणि सुकेश चंद्रशेखर यांच्यात जवळचे संबंध होते.चंद्रशेखरने जॅकलिनला सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने, आयात केलेली क्रॉकरी दिली होती. याशिवाय 52 लाख रुपये किमतीचा घोडा आणि 9-9 लाख रुपये किमतीच्या चार पर्शियन मांजरीही भेट म्हणून देण्यात आल्या होत्या.चंद्रशेखरने जॅकलिनवर सुमारे 10 कोटी रुपये खर्च केल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले आहे. जॅकलिनच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याचा खर्चही सुकेशने उचलला होता.ही भेट सुकेशची जामिनावर सुटका झाल्यानंतर झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
केवळ जॅकलिनच नाही तर अभिनेत्री नोरा फतेही हिलादेखील सुकेशने आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्याकडून नोराला अनेक महागड्या भेटवस्तूही पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे नोराही ईडीच्या रडारवर आली आहे.