मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दीपिकाच्या छातीत अचानक वेदना सुरू झाल्या. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिचे चेकअप करण्यात आले आहे. दीपिका आता ठिक असून ती विमानाने हैदराबादहून मुंबईकडे रवाना झाली आहे. दीपिकाला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
दीपिकाचा आगामी चित्रपट Project K ची शूटिंग सुरू आहे. या चित्रपटात दीपिकासोबत दाक्षिणात्य अभिनेता आणि सुपरस्टार प्रभास दिसणार आहे


