ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी ब्रिटनमध्ये कोरोनाचे काही निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे.आता ब्रिटनमधील जनतेला पुन्हा एकदा मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि दुकानात मास्क अनिवार्य करण्यात आला आहे.ब्रिटनमध्ये येणाऱ्या प्रवाशांना आता कोरोना चाचणी देखील बंधनकारक करण्यात आली आहे. प्रत्येकाला आता RT-PCR चाचणी करावी लागणार आहे. जोपर्यंत अहवाल निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत त्या प्रवाशांनी विलगीकरणात राहावे लागणार आहे.
ब्रिटनमध्ये जर एकाद्याचा अहवाल ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळला, तर त्याच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना दहा दिवस क्वारंटाईन केले जाणार आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटला रोखण्यात आम्ही हवे ते प्रयत्न करत आहेत. तसेच कोरोना लसीकरणाचा वेग देखील वाढवण्यात आला आहे. असे जॉनसन म्हणाले.