आफ्रिकेत कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हेरिअंट आढळला आहे. नव्या व्हेरिअंटमुळे अमेरिकेने अफ्रिकेच्या प्रवाशी विमानांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपति जो बायडेन म्हणाले की, सोमवारपासून दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, जिम्बाब्वे, नामीबिया, लेसोथो, एस्वातिनी, मोजाम्बिक आणि मलावी या देशांच्या विमान प्रवासावर काही काळ बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आफ्रिकन देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी जपानने नियम कडक केल्याचे पाहायला मिळत आहे. 27 नोव्हेंबरपासून आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना 10 दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. हे निर्बंध इजिप्त, सिंगापूर मलेशिया, दुबई, सौदी अरेबिया, जॉर्डन या सात आफ्रिकन देशांवर लादले जाणार आहेत.
ऑस्ट्रेलियाने सुरक्षेची खबरदारी म्हणून नऊ आफ्रिकन देशाच्या सर्व विमानांना बंदी घालण्यात आली आहे. जो कोणी ऑस्ट्रेलियाचा नागरिक गेल्या दोन आठवड्यापासून आफ्रिकेच्या देशांमध्ये गेला असेल, त्याने ऑस्ट्रेलियात प्रवेश करू नये.
भारताने आत्तापर्यंत कोणत्याही देशाच्या उड्डाणांवर बंदी घातलेली नाही, परंतु दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, इस्रायल, हाँगकाँग आणि ब्रिटन यासह युरोपातील काही देशांतून येणाऱ्या प्रवाशांना विमानातील प्रवास करता येणार आहे. मात्र नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.