ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसांवर दबाव

0
110

कोरोनाच्या रुग्णांमुळे सगळीकडची रुग्णालये खचाखच भरली आहेत. त्यातच औषधांचा आणि ऑक्सिजनचा पुरवठाही होत नाही आहे. अनेक रुग्नांचे प्राण यामुळे जात आहेत. त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. एफडीएने लसीचा पुरवठा करण्याची विनंती ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला केली होती. त्यावर त्याने असमर्थता दर्शवली होती असे वळसे पाटलांनी सांगितले आहे.राज्यात 50 हजार रेमडेसिवीरचा साठा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पुरवठादाराकडे लसीचा पुरवठा करण्याचे पत्रं असल्याची माहीती पोलिसांना नव्हती. त्यामुळे पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले होते. पण, ही चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे काही सहकाऱ्यांसह पोलिस ठाण्यात पोहोचले आणि पोलिसांवर दबाव टाकला. शासकीय कामात हस्तक्षेप यापूढे सहन केल्या जाणार नाही, असा इशारा वळसे-पाटील यांनी दिला आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कुणाकडे जाणार होता, याची चौकशी करण्यात येईल. हा साठा पोलिसांनी जप्त केलेला नाही. हा साठा कंपनीकडेच असून त्याचा वेगळा वापर करणार आहेत की नाही याची चौकशी करण्यात येईल, असेही वळसे पाटील म्हणाले.या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर टाकलेला दबाव हा सरकारी कामातील हस्तक्षेप असून त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ असेही त्यांनी सांगितले.

Some unapproved COVID-19 treatments may cause serious harm.Source: World Health OrganizationGet COVID-19 Info

11

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here