कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरिएंट देशात दाखल झाला आहे. देशभरात 568 नमुन्याची तपासणी केली जात असल्याची माहिती कोविड जेनोमिक्स कन्सोर्टियम आणि GSAID ने दिली आहे. या नव्या व्हेरिएंटचे नाव डेल्टाक्रोन असून सध्या देशभरात ७ राज्यात या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत.डेल्टाक्रोनचे शास्त्रीय नाव BA.1 + B.1.617.2 असे आहे.
यामध्ये सर्वाधिक 221 रुग्ण कर्नाटक राज्यात आढळले आहेत. तसेच तामिळनाडूमध्ये 90, महाराष्ट्रात 66, गुजरातमध्ये 33, पश्चिम बंगालमध्ये 32 आणि तेलंगणात 25 आणि नवी दिल्लीत 20 रुग्ण आढळून आले आहे.डेल्टाक्रॉन हा कोरोना विषाणूचा एक संकरित प्रकार आहे. डेल्टा आणि ओमिक्रॉनचे तो मिश्रण आहे.
केंद्र सरकारने कोरोनाचा या व्हेरिएंटबाबत महत्त्वाची माहिती देत गंभीर इशारा दिला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. ऑमिक्रॉन व्हेरिएंट अजून भारतातून गेलेला नाही, काळजी घ्या, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.


