मुंबई : राज्यातील जनतेला माहितीच आहे की, २०१९ मध्ये राज्याच्या राजकारणातील सत्ताकेंद्र शरद पवारांचे मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओक राहिले होते. आता सिल्व्हर ओक पुन्हा चर्चेत आले आहे. राष्ट्रवादीच्या त्रासामुळे व अजित पवार निधी देत नसल्याची तक्रार करत महाविकास आघाडीतून बाहेर पडलो असं म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी थेट शरद पवारांवर टीका केली होती. मात्र आज तेच नेते पवारांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.’ शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सिंधुदुर्ग-जिल्हा-डीएड/
शुक्रवारी दुपारच्या सुमारास या नेत्यांनी पवारांची भेट घेतली. शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवास्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले. अचानक शिवसेनेचे नेते सिल्व्हर ओकवर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. या भेटी वेळी प्राध्यापक प्रदीप ढवळ हे देखील उपस्थित होते. ही भेट कशा संदर्भात होती या संदर्भात कोणताही खुलासा करण्यात आला नसल्यामुळे भेटीचे कारण गुलदस्त्यातच आहे. तिन्ही नेत्यामध्ये कुठल्या मुद्यावर चर्चा झाली. याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.