भय आणि भ्रष्टाचारमुक्त सरकारवर शिक्कामोर्तब – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

0
181
भय आणि भ्रष्टाचारमुक्त सरकारवर शिक्कामोर्तब - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

उत्तर प्रदेशसह उत्तराखंड,गोवा आणि मणिपूर या चार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे.भाजप प्रचंड बहुमताने उत्तर प्रदेशात सत्ता स्थापन करणार आहे.जवळपास 40 वर्षांनी उत्तर प्रदेशातील जनतेने सत्तेवर असलेल्या पक्षाच्या बाजुने कौल दिला आहे. भाजपने जवळपास 268 जागा मिळवल्या आहेत. तर समाजवादी पक्षाला केवळ 130 जागा मिळवता आल्या. संपूर्ण देशाच्या आणि जगाच्या नजरा विशेषतः उत्तर प्रदेशकडे लागल्या होत्या.

उत्तर भारतातील राज्यांमध्ये जातीचे राजकारण हे एक गडद वास्तव आहे. स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करणाऱ्या भारतात आजही परिस्थिती जशीच्या तशी आहे. सध्या तरी यामध्ये बदल होण्याची शक्यता शून्य असल्याचे दिसून येत आहे. जातीविहीन समाजाची कल्पना अनेक महापुरुषांनी केली पण ती आकार घेऊ शकली नाही.शेतकरी आंदोलनाच्या वेळी शेतकऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराचे समर्थन करणारा एक वर्ग होता.आजही लोक जातीच्या आधारावर मतदानाला प्राधान्य देत असल्याचा एक प्रकारचा संदेश यातून मिळतो.आशिष मिश्रा यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरूच राहील, पण त्यांच्या वडिलांना त्रास होऊ दिला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. त्या खुल्या पाठिंब्याचा परिणाम म्हणजे लखीमपूर खेरीमध्ये कमळ फुलले. 

आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आज आपण या विजयाच्या माध्यमातून लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहेत. आजचा निकाल 2024 च्या निवडणुकीची दिशा ठरवणार आहे. तरुणाई, माता-भगिणींनी भाजपला समर्थन देऊन एक मोठा संदेश दिला आहे असे भाजपच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात बोलताना म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here