भराडी मातेच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक

0
39
भराडी देवी

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

मालवण- आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेला गुरुवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. मध्यरात्री तीनपासून हजारो भाविकांनी आई भराडीच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.

एसटी संपाचा भाविकांना फटका

दरवर्षी आंगणेवाडी यात्रोत्सवात कणकवली, मालवण आणि मसुरे अशा तीन स्वतंत्र स्टँडवरून शेकडो एसटी बस भाविकांना अहोरात्र सेवा देतात. यावर्षी एसटी महामंडळाच्या संपाचा फटका भाविकांना बसला.

व्हीआयपींची गर्दी
केंद्रीय मंत्री नारायण राणे, परिवहन मंत्री अनिल परब, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, आ. आशिष शेलार, खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, नीतेश राणे, राजू पाटील, विनायक मेटे, महापौर किशोरी पेडणेकर यांनी दर्शन घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here