भविष्यातील करिअर मार्गदर्शन यावर शिरगाव हायस्कूल, महाविद्यालय मा. श्री नितीन बांदेकर यांचे व्याख्यान

0
73

प्रतिनिधी -पांडुशेठ साठम

शालेय शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर नक्की करणे गरजेचे असते. त्यामुळे शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगाव मधील इयत्ता 12 कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यासाठी शिरगाव हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री विजय शेट्ये यांच्या प्रयत्नातून पुण्याचे मा. श्री नितीन बांदेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास शिरगाव हायस्कूलचे अधिक्षक मा. रविंद्र जोगल साहेब हे उपस्थित होते. श्री बांदेकर व श्री जोगल यांना प्रशालेचे प्राचार्य एस एन आत्तार यांनी पुष्प देऊन स्वागत केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्याची ओळख श्री सागर करडे सर यांनी केले.या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्पूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना भविष्यात कोणते क्षेत्र निवडता येऊ शकते याची माहिती आजच्या या व्याख्यान मुळे आली अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. श्री बांदेकर यांची व्याख्याने शाळेत वारंवार आयोजित करावी अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.श्री बांदेकर यांनी मी जेव्हा जेव्हा कोकणात येईल तेव्हा तेव्हा शिरगाव हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीन असे आश्वासन दिले.या कार्यक्रमाला शिरगाव गावातील माजी विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री सागर करडे सर यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here