साडेतीन दशकांनंतर यूपीमध्ये एकाच पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेत आले आहे.तर योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत.आम आदमी पक्षानेही दिल्लीनंतर पंजाब काबीज करत नवा इतिहास रचला आहे. काँग्रेस कमकुवत झाल्याने भाजपला आता आप टक्कर देत आहे. त्याचवेळी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सरकार स्थापन करणारा आप हा पहिलाच प्रादेशिक पक्ष ठरला आहे.
पंजाब निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपला पर्याय म्हणून आता आपकडे पाहिले जाऊ शकते. जिंकण्याची शक्यता असलेल्या पंजाबमध्ये परस्पर गटबाजीमुळे काँग्रेसने पंजाबची सत्ता गमावली आहे. देशभरात प्रचार करू शकते. विशेषत: ज्या राज्यांमध्ये भाजप कमकुवत आहे, तेथे भाजपच्या बाजूने वातावरण तयार करण्यासाठी भाजप यूपी मॉडेलचा वापर करु शकतो.
या वर्षाच्या अखेरीस हिमाचल प्रदेशातील 68 आणि गुजरातमधील 182 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.या विजयामुळे भाजपाची ताकद वाढली असून त्याचा फायदा या राज्यात त्यांना घेता येईल.पंजाब वगळता चार राज्यांतील विजयामुळे लोकसभा निवडणुकीतही भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.यूपीमध्ये भाजपच्या पुनरागमनामुळे हिंदुत्वाचा अजेंडा आणखी मजबूत होईल.
अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षानेही केंद्राचे कोरोनाच्या काळातील अपयश, बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांवर प्रकाश टाकत केलेल्या प्रचाराचाही परिणाम या निवडणुकीत दिसून आला.