भाजप आमदाराच्या मालकीचा ट्रॉलर जप्त? महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी!

0
2

पणजी | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बंदी असलेल्या एलईडी मासेमारी उपकरणांचा वापर करून मासेमारी करत असल्याप्रकरणी गोव्यातील दोन ट्रॉलर्स महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. गुरुवारी करण्यात आलेल्या या कारवाईत संबंधित ट्रॉलर्स महाराष्ट्राच्या सागरी अधिकारक्षेत्राचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट झाले असून स्थानिक कायद्यांनुसार ही पद्धत बेकायदेशीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एलईडी लाईट्सच्या मदतीने मासेमारी केल्यास मोठ्या प्रमाणावर मासे आकर्षित होतात, ज्यामुळे सागरी परिसंस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या प्रकारच्या उपकरणांवर बंदी घातली असून, त्य नियमांचे उल्लंघन झाल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या ट्रॉलर्सपैकी एक गोव्यातील भाजप आमदाराच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे आंतरराज्य सागरी हद्दीतील नियंत्रण आणि बेकायदेशीर मासेमारीविरोधातील कारवाईबाबत चर्चेला उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here