भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला सायबर चोरट्यांनी फसविल्याचे वृत्त हाती आले आहे.केवायसी अपडेटच्या बहाण्यानं विनोद कांबळी याला 1 लाख रुपये 14 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. कांबळी याच्या बँक अकउंटमधून सायबर चोरट्यांनी रक्कम परस्पर पळवली आहे.
विनोद कांबळीना 3 डिंसेबरला ‘बँकेतून बोलतो…केवायसी अपडेटसाठी लिंक पाठवली आहे’,असा फोन सांगण्यात आला. केवायसी अपडेट न केल्यास खात्यामधील व्यवहार बंद होतील, असं देखील त्याने सांगितलं. त्यामुळे कांबळीनं फोनवर आलेला ओटीपी (OTP) समोरील व्यक्तीला दिला. एका सेकंदात कांबळीच्या अकाऊंटमधून 1 लाख 14 हजार रुपये काढल्याचा त्याला मेसेज आला आणि समोरील व्यक्तीनं कांबळीसोबतचा संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कांबळीनं वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तांत्रिक पुरावे, बँक तपशील आणि मोबाइल क्रमांकावरून आरोपींचा शोध सुरु केला आहे.
आपल्या बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती इतरांना देऊ नका. सरकारी संस्था किंवा बँक तुमच्या बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती विचारत नाही. तसेच अनोळखी व्यक्तिकडून आलेल्या टेक्स्ट मेसेजद्वारा पाठवण्यात आलेले अॅप्लिकेशन तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल करू नका. केवल Google Play आणि Apple ऐप स्टोअरवरून प्रोग्राम डाऊनलोड करावा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.