भारताची हरनाज संधू तब्बल 21 वर्षांनंतर मिस युनिव्हर्स बनली आहे. लारा दत्ता 2000 साली मिस युनिव्हर्स बनली होती. तेव्हापासून भारताला या विजेतेपदाची प्रतीक्षा होती. 70 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 12 डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये झाली.
यामध्ये हरनाजने 79 देशांच्या सौंदर्यवतींना मागे टाकत मिस युनिव्हर्सचा ताज पटकावला. मिस युनिव्हर्सची रनर अप मिस पॅराग्वे नादिया फरेरा आणि दुसरी रनर अप मिस दक्षिण आफ्रिका ललेला मसवाने होती. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला मिस युनिव्हर्स स्पर्धेला जज करण्याची संधी मिळाली. ती भारतासाठी ज्युरी टीमचा भाग होती. चंदीगडच्या हरनाज संधूने ‘मिस दिवा मिस युनिव्हर्स इंडिया 2021’चा खिताब जिंकला होता. तेव्हापासून तिने मिस युनिव्हर्स 2021 चा ताज जिंकण्यासाठी मेहनत करायला सुरुवात केली होती. तिला घोडेस्वारी, पोहणे, अभिनय, नृत्य आणि प्रवासाची खूप आवड आहे. जेव्हा ती मोकळी असते तेव्हा ती तिचे छंद पूर्ण करते. भविष्यात संधी मिळाली तर तिला चित्रपटातही काम करायचे आहे.