भारतात ‘ॲब्रोसिटिनिब’ सादर करण्यासाठी ‘ग्लेनमार्क’ची ‘फायझर’सोबत भागीदारी

0
73
‘ग्लेनमार्क’ची ‘फायझर’सोबत भागीदारी
भारतात ‘ॲब्रोसिटिनिब’ सादर करण्यासाठी ‘ग्लेनमार्क’ची ‘फायझर’सोबत भागीदारी

• एटॉपिक डर्मटायटीस (एडी) हा मध्यम ते गंभीर स्वरुपाचा त्वचारोग असलेल्या प्रौढ रुग्णांसाठी ॲब्रोसिटिनिब हा एक प्रगत मौखिक उपचार आहे. भारतामध्ये हे औषध लवकरच उपलब्ध होत आहे.

• ॲब्रोसिटिनिब या औषधामुळे खाज त्वरीत थांबते, रोगावर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येते आणि रुग्णाला आराम मिळतो.

• मध्यम ते गंभीर एटॉपिक डर्मटायटीस असलेल्या प्रौढांसाठी ॲब्रोसिटिनिबचे वितरण करण्याची अधिकृत परवानगी सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) या संस्थेने फायझरला दिली आहे.

• भारतात ॲब्रोसिटिनिबचे विपणन ग्लेनमार्कतर्फे जॅब्रियस आणि फायझरतर्फे सिबिन्को’ या ब्रँड नावांनी करण्यात येईल.

मुंबईभारत २०२४ : फायझर आणि ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड (ग्लेनमार्क) या दोन कंपन्यांनी मध्यम ते गंभीर स्वरुपाचा एटॉपिक डर्मटायटीस (एडी) असलेल्या प्रौढ रुग्णांना तोंडातून घेता येण्याजोगे ॲब्रोसिटिनिब हे प्रगत औषध भारतामध्ये उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आपसांत भागीदारी केली आहे. ॲब्रोसिटिनिब हे फायझर कंपनीने विकसीत केलेले औषध असून भारतातील केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन – सीडीएससीओ) या संस्थेने ॲब्रोसिटिनिबचे विपणन करण्याची अधिकृत परवानगी फायझरला दिली आहे. तसेच अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासन (एफडीए), युरोपियन मेडिसीन एजन्सी (ईएमए) आणि इतर नियामक संस्थांनीही या औषधाला मंजुरी दिली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-सारथीच्या-योजनांचा-प्/

ग्लेनमार्क व फायझर यांच्याद्वारे अनुक्रमे जॅब्रियस आणि सिबिन्को या ब्रँड नावांनी ॲब्रोसिटिनिबचे भारतात सह-विपणन केले जाईल. मध्यम ते गंभीर स्वरुपाचा एटॉपिक डर्मटायटीस असलेल्या प्रौढ रुग्णांवर सुधारित परिणामकारकता साधण्याच्या दृष्टीने हा अभूतपूर्व मौखिक उपचार असून तो उपलब्ध करण्यासाठी या दोन्ही कंपन्या आपले कौशल्य पणाला लावतील. ॲब्रोसिटिनिब (सिबिन्को) हे औषध अमेरिका, जपान, चीन यांच्यासह जगभरातील ३५हून अधिक देशांमध्ये सध्या उपलब्ध आहे.

एटॉपिक डर्मटायटीस हा त्वचेचा एक जुनाट स्वरुपाचा रोग आहे. यामध्ये त्वचेची जळजळ आणि लालसर चट्टेसूज, खाजवेदना अशी लक्षणे आढळतात. मध्यम व तीव्र स्वरुपाचा हा रोग असेलतर सततच्या खाजेमुळे रुग्णाच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय येतोतसेच त्याचा सामाजिक वावर, कामाची उत्पादकता आणि एकंदरीत आरोग्य यांवरही परिणाम होतो. ॲब्रोसिटिनिब हे जॅनुस कायनेस वन (जेएके१) इनहिबिटर स्वरुपाचे औषध आहे. या औषधामुळे खाज त्वरीत थांबते, रोगावर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येते आणि रुग्णाला आराम मिळतो.

फायझर इंडियाच्या कंट्री प्रेसिडेंट आणि व्यवस्थापकीय संचालिका मीनाक्षी नेवातिया म्हणाल्या, ॲब्रोसिटिनिबच्या परिवर्तनीय क्षमतेवर आमचा विश्वास आहे. भारतात मध्यम ते गंभीर एटॉपिक डर्मटायटीस असणाऱ्या रुग्णांसाठी उच्च गुणवत्तेचे उपचार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ॲब्रोसिटिनिबला मंजुरी मिळणे ही एक महत्त्वाची घटना आहे. या औषधामुळे रुग्णांना आपल्या आजारावर अधिक प्रभावीपणे उपचार घेता येतील. ग्लेनमार्कसोबतच्या आमच्या भागीदारीमुळे आमच्या सामूहिक सामर्थ्याचा आणि क्षमतांचा लाभ देशभरातील रूग्णांना व डॉक्टरांना घेता येईल व ही उपचारपद्धती यशस्वीपणे राबविता येईल.”

ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लि.चे प्रेसिडेंट व इंडिया फॉर्म्युलेशन विभागाचे व्यवसाय प्रमुख अलोक मलिक म्हणाले, “देशात ॲब्रोसिटिनिब सादर करण्यासाठी आम्ही फायझर इंडियासोबत सहयोग करण्यास उत्सुक आहोत. भारतात पर्यावरणीय बदलांमुळे एटॉपिक डर्मटायटीसचे प्रमाण वाढत असल्याचे नोंदवले गेले आहे. सुमारे ८० टक्के रूग्णांमध्ये या आजाराची लक्षणे सुरुवातीच्या काळात दिसून येतात. त्वचाविकारांवरील उपचारांत भारत अग्रेसर असल्यानेयेथे मध्यम ते गंभीर स्वरुपाच्या एडीग्रस्त रुग्णांसाठी या प्रभावी औषधाचा वापर उपयुक्त ठरेल. त्वचाविकारावरील उपचारांच्या क्षेत्रात या औषधामुळे आमचे प्राबल्य निर्माण होऊ शकेल.

भारतात एडीचा प्रसार

गेल्या तीन दशकांपासून एडीचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत आहे. विकसीत देशांमध्ये एडीचा प्रसार सुमारे १० ते २० टक्के इतका झालेला आहे. भारतात सुमारे ५.९ टक्के प्रौढ नागरीक एडीग्रस्त आहेत. त्यांपैकी ४.४ टक्केजणांना हा आजार गंभीर स्वरूपात झालेला आहे. त्वचेला सतत खाज येणेत्यामुळे झोप न लागणे या लक्षणांमुळे रूग्णांना व त्यांची काळजी घेणाऱ्यांना खूप त्रास होतो. त्यांचे जीवनमान, मानसिक आरोग्य अशा अनेक पैलूंवर या आजाराचा विपरीत परिणाम होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here