भारताला मित्र देशांकडून मिळाला मदतीचा हात !

0
100

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हौदोस घातला आहे. देशाची जनता या सर्वांशी सामना करत आहे. प्रत्येक नागरिक एकमेकाला मदत करत आहेत. या परिस्थितीत भारताला मित्र देशांकडून मदतीचा हात मिळाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी, भारत आमचा मित्र देश आहे. अशा कठीण प्रसंगी आम्ही सोबत आहोत. आम्ही भारताच्या सतत संपर्कात आहोत. भारताला तात्काळ 600 मेडिकल इक्विपमेंट्स पाठवले जात आहेत. यात ऑक्सीजन कॉन्संट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर्स सामील आहेत असे म्हटले आहे. दुबईने बुर्ज खलीफाला भारतीय तिरंग्यात रंगवून भारतासोबत असल्याचा संदेश दिला.

भारतात मेडिकल ऑक्सीजन कॅपेसिटी वाढवण्यासाठी फ्रांस आणि जर्मनीने तयारी केली आहे. जर्मन चांसलर एंजेला मर्केलने याला ‘मिशन सपोर्ट इंडिया’ नाव दिले आहे. आपण सर्व महामारीचा सामना करत आहोत. आम्ही भारतासोबत आहोत. आम्ही यासाठी तयारी केली आहे. फ्रांसनेदेखील भारतासोबत असल्याचे म्हटले. यानंतर ऑस्ट्रेलियानेही लागेल ती मदत पुरवण्याचा विश्वास दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here