भारतीय लोकदैवत खंडोबाच्या जेजुरी रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या  जलद  गाडीचे  मार्तंड विजय नामकरण व्हावे यासाठी भाविक पर्यटकांचे मध्यरेल्वे प्रशासनाला साकडे 

0
51

हरिश्चंद्र विजयकुमार

पुणे – जेजुरी रेल्वेस्थानकावरून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यानं थांबा आवश्यक तर   जेजुरी देवता सम्बधित एखद्या रेल्वेगाडीचे नामकरण व्हावे, केंद्रीय रेल्वे प्रशासनाला साकडे      जेजुरी भारतीय लोकदैवत आणि महाराष्ट्राचे कुलस्वामी असलेल्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत असलेल्या ब्रिटिश कालीन रेल्वे स्थानकातून राज्य व राज्याबाहेर जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या एक्सस्प्रेस धावत असतात महत्वाचे तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ आणि औद्योगिक वसाहत असल्या मुळे भाविक पर्यटक आणि उद्योग व्यवसायिक नोकरदार वर्गाची ये जा तर होत असतेच त्यातच जेजुरी सांस्कृतिक यात्रा उत्सव सणांचे माहेरघर असल्या कारणाने राज्य व्यतिरिक्त देशविदेशातील नागरिकही येत असतात  वास्तविक  हे पहाता खासदार सुप्रियाताई आणि स्थानिक पत्रकारांच्या पाठ पुराव्या नंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या पुढाकाराने जेजुरी रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले असून येथील सोयसुविधांची विकास कामे ही सुरू आहेत   

जेजुरीच्या धार्मिक धर्मिकसंस्कृतीक महत्व पाहता  खंडोबानगरी सम्बधित मार्तंडविजय एक्सस्प्रेस ,अथवा जयाद्री एक्सस्प्रेस ,किंवा मल्हारस्वामी एक्सस्प्रेस असे एखादे तरी नामकरण  येथून धावणाऱ्या गाडीस दिले जावे आणि येथील रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबणे आवश्यक आहे  अशी मागणी करीत या बाबतचे निवेदन ही खंडोबा भक्त व माजी देवसंस्थान अध्यक्ष डॉ राजकुमार लोडा , धालेवाडी कऱ्हामल्हार विकास समितीचे हनुमंत काळाने  समाजसेवक मेहबूबभाई पानसरे ग्रामस्थ ,मानकरी खांदेकर गावकरी मंडळ   स्वामीमय सेवा प्रतिष्ठान जेजुरी शहर  कृती समिती  डॉ सुधीर ताम्हणे डॉ नितीन केंजळे गणेश आगलावे , राहुल मंगवाणी ,उन्मेष जगताप  गणेश आबनावे., सचिन पेशवे  गणेश भोसले  कोल्हापूर खंडोबा सेवा मंडळ आदींनी मागणी केली असून पुणे जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष भय्यासाहेब खाटपे ,यांच्या माध्यमातून डॉ राजकुमार लोडा  केंद्रीय रेल्वे प्रशासनाचा पाठपुरावा करीत आहेत.

या मार्गावरून राज्य व राज्यशिवाय महत्वपूर्ण पर प्रांतांत जात येऊ शकते म्हणूनय मार्गावरून जाणाऱ्या थांबा मिळवा अशी मागणी भाविक नागरिक आणि पर्यटकांची आहे  रेल्वेचेअसे नामकरन आणि लांब पल्ल्याच्या गाड्या थांबल्यास,धर्मिकसंस्कृतीक भोगोलीक विकासा बरोबर अर्थकरनात मोठा विकास साधला जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here