भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

0
38
भारतीय सशस्त्र सैन्यदल
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l रत्नागिरी –

🟧 भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (सीडीएस) परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फे नवयुवक व नवयुवतीसाठी १६ जून ते २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. ६५ आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणर्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे ११ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मुलाखतीस हजर रहावे. https://sindhudurgsamachar.in/भारतात-आता-मिळणार-ई-पासपो/

मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (डीएसडब्ल्यू) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील सीडीएस-65 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेवून यावे.

अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाटसअप क्र. ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा कोषागार अधिकारी तथा प्र. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रवींद बिरादार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here