भारतीय सैन्यदलातर्फे महिलांसाठी खास बाइक रॅली लाँच

0
22
२५ व्या कारगिल विजय दिवसाच्या सन्मानार्थ आयोजन
भारतीय सैन्यदलातर्फे महिलांसाठी खास बाइक रॅली लाँच

* २५ व्या कारगिल विजय दिवसाच्या सन्मानार्थ आयोजन * २५ रायडर्स टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० आणि टीव्हीएस रॉनिन मोटारसायकलवर स्वार होत १२ दिवसांत २००० किमीचे अंतर पार करणा

शैलेश कसबे

लेह, ४ जुलै २०२४ – लेहचे माननीय एलजी, ब्रिगेडियर (डॉ.) बी.डी. मिश्रा यांनी ऑल वुमन बाइक रॅलीला झेंडा दाखविला. २५ रायडर्सचा समावेश असलेली ही रॅली कारगिल विजय दिवसाच्या रजत जयंती महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आली आहे. कारगिल युद्धादरम्यान भारतीय सैन्यदलाने गाजविलेल्या अतुलनीय शौर्याला सलाम करण्यासाठी भारतीय सैन्यदलाने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये या रॅलीचाही समावेश आहे.

लेहमधील हॉल ऑफ फेम येथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात या रॅलीला झेंडा दाखविण्यात आला. यावेळी जनरल ऑफिसर कमांडिंग, फायर अँड फ्युरी कॉर्प्स, ले. जनरल हितेश भल्ला,
एससी, एसएम, व्हीएसएम आणि श्री. विमल सुम्ब्ली, प्रमुख व्यवसाय – प्रीमियम, टीव्हीएस मोटर कंपनी हे उपस्थित होते.

या आव्हानात्मक रॅलीमध्ये २५ असामान्य महिला रायडर्स जिद्द आणि चिकाटीसह उतरणार असून, त्या भारताच्या विविध भागांतून येणार आहेत. या महिलांमध्ये सैन्यदल, सैन्यदलातील जोडीदार आणि सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे. त्या टीव्हीएस अपाचे आणि टीव्हीएस रोनिन मोटारसायकल चालविताना दिसतील. या उपक्रमाच्या माध्यमातून कारगिल विजय दिवस साजरा करण्याबरोबर ‘सांस्कृतिक आणि सामूहिक वैविध्य’ अधोरेखित करण्याचा हेतू आहे. ही रॅली १२ दिवस चालणार असून, लडाखच्या कानाकोपऱ्यातून आव्हानात्मक प्रवास करत २००० किमीचे अंतर पार करेल.
ही रॅली रायडर्सना सैन्यदलाने केलेल्या विलक्षण त्यागाची आठवण करून देईल, तसेच लडाखमधील सर्व युद्ध स्मारकांपाशी श्रद्धांजली वाहण्याची संधी देईल.
लडाखमधले एकापेक्षा एक कठीण भूभाग ओलांडत ही रॅली जगातील दोन सर्वांत उंच मोटरेबल पासेस – खारदुंग ला आणि उमलिंग ला पार करेल व त्यानंतर कारगिल युद्ध स्मारकापर्यंत पोहोचेल.

श्री. विमल सुम्ब्ली, प्रमुख व्यवसाय – प्रीमियम, टीव्हीएस मोटर कंपनी याप्रसंगी म्हणाले, ‘एक भारतीय या नात्याने आम्हाला भारतीय सैन्यदलाचा आणि ते करत असलेल्या देशसेवेचा प्रचंड अभिमान वाटतो. या मोहिमेसाठी सलग दुसऱ्या वर्षी त्यांच्यासह भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. टीव्हीएस अपाचे आणि टीव्हीएस रॉनिनचे जगभरात ५.५ दशलक्ष ग्राहक- रायडर्स पसरलेले असून, या मोटारसायकल्स या मोहिमेतील आव्हानात्मक प्रदेशांवर कामगिरी, अनोखे डिझाइन, तंत्रज्ञान आणि इंजिनीअरिंगसह मात करतील आणि महत्त्वाचे म्हणजे, रायडरची सुरक्षा व आरामदायीपणावर भर देतील. टीव्हीएस मोटर्सच्या वतीने आम्ही भारतीय सैन्यदलाला या मोहिमेसाठी शुभेच्छा देतो.’

ही रॅली तरुणाईला विशेषतः मुली आणि स्त्रियांना प्रेरणा देण्यासाठी विविध कार्यक्रम व संवादांचे आयोजन करत आहे. त्याद्वारे तरुणाईला त्यांना हव्या त्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरी करण्यास प्रेरणा देण्याचे आणि नागरी क्षेत्र व भारतीय सैन्यदल यांच्यात समन्वय, एकरूपता आणि सहकार्य तयार करण्याचे ध्येय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here