भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणी बॉम्ब शोध पथकामार्फत घातपात विरोधी तपासणी करण्यात आली.राजापूर पोलिसांनमार्फत स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने राजापूर एस.टी. डेपो येथे मॉक ड्रिल राबविण्यात आले. राजापूर पोलिसांमार्फत राजापूर येथे नाकाबंदी दरम्याने १८ मोटर वाहन केसेस करण्यात आल्या.
त्यातच आज सकाळी रत्नागिरीत दूरसंचार यंत्रणेचा बेकायदेशीर वापर करून आतंरराष्ट्रीय कॉल केल्याची घटना उघड होताच पोलिसांनी दोन आरोपींना पकडले. एका मोबाईल दुकानात जिओ कंपनीकडून सीम ट्रॅकिंग यंत्रणा बसवन्यात आली होती संगणकाचा वापर बेकायदेशीरपणे करून कॉल राऊटिंगच्या माध्यमातून देशांतर्गत आणि आतंरराष्ट्रीय कॉलची अवैध सेवा देत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली होती . तसेच शासनाचा महसूल बुडवत शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणात अन्य काही आरोपी असल्याचा संशय असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


